उद्या अमळनेरात ईव्हीएम हटाव परिवर्तन यात्रा…
परिवर्तन यात्रेच्या स्वागतासाठी अमळनेरकर सज्ज…

0

EVM हटाव, संविधान बचाव

अमळनेर. ( प्रतिनिधी ) लोकशाहीआणि संविधान वाचविण्यासाठी भारत मुक्ति मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जन आंदोलनाचे प्रणेते,बहुजन क्रांति मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक मा.वामन मेश्राम यांनी संपूर्ण भारतात कन्याकुमारी ते कश्मीर अशी इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा (पार्ट-२) सुरुवात केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यात या या

त्रेचे आगमन होत असून ही परिवर्तन यात्रा धुळ्याहून अमळनेर शहरात येत आहे उद्या दि.३ मार्च २०२३ रोजी या यात्रेची सुरुवात सकाळी 9.00 वाजता होईल. या परिवर्तन यात्रेच्या स्वागतासाठी अमळनेर कर सज्ज झाले आहेत.
ही परिवर्तन यात्रा प्रबुद्ध विहार-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-अण्णा भाऊ साठे स्मारक-बळीराजा स्मारक-महाराणा प्रताप चौक-संत गाडगेबाबा स्मारक (बस स्टँड)-अहिल्यामाई होळकर स्मारक (पाच पावली)-दगडी दरवाजा समोरून पाच कंदील चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (गांधलीपुरा) नंतर ताडेपुरा मार्गे धरणगाव कडे प्रयाण करेल.
पुढे धरणगाव हून जळगाव मार्गे जामनेर येथे जाईल व येथे सायंकाळी ६:०० वाजता जुन्या पं.स समोर,वाकी रोड,जामनेर येथे सभेत रूपांतर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!