एरंडोलला जागतिक महिला दिन-महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न..
5 कि. मी. अंतर – महिला मंडळांचे आयोजन – नवविवाहीता, गृहिणींचा सहभाग..

एररंडोल (कुंदन सिंह ठाकुर )- जागतिक महिला दिनी – 8 मार्च रोजी एरंडोलला महिला मॅरेथॉन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले. सकाळी

साडेसहा वाजता पद्मालय फाटा ते जहागिरदारांचा मळा असे 5 कि. मी. अंतरासाठी नवविवाहीतांसह गृहिणींनी सहभाग नोंदविला. शहरातील महिला मंडळांतर्फे मॅरेथॉन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंडळ, साळी समाज महिला मंडळ, शारदोपासक महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, गुजर समाज महिला मंडळ, सर्वधर्म समभाव महिला मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, मानसी महिला मंडळ, रेणूका महिला मंडळ सदस्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेची सुरुवात सैनिकपत्नी बडगुजर यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. विशेष म्हणजे सहभागी महिलांसाठी 20 ते 40 आणि 40 वर्षांवरील महिला असे दोन गट पाडण्यात आले होते. यासाठी पांढरा ड्रेस अथवा साडी, कॅप असे ड्रेस कोड ठरवून देण्यात आला होता. सकाळी 6 वाजेपासून पद्मालय फाटा (कमान) जवळ महिलांची उपस्थिती होती. यासाठी मोटार सायकलस्वार, स्कूल बस, पाणी बॉटल, बिस्किटे, प्रथमोपचार बॉक्स आदींची व्यवस्था करण्यात आली होती. कोणालाही दुखापत झाली नाही. स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी पहिल्या गटात प्रथम क्रमांक वंदना मुकेश पाटील, द्वितीय डॉ. जुमाना इब्राहिम बोहरी, तृतीय पुनम राहुल पाटील तर उत्तेजनार्थ अर्चना मंगेश पाटील यांनी पटकावला. दुसर्या गटात प्रथम क्रमांक उर्मिला संजय पाटील, द्वितीय मालिनी नितीन भुसनळे, तृतीय प्रियंका अनुपम जाजू यांनी तर उत्तेजनार्थ अर्चना राहुल तिवारी यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना दि. 12 मार्च रोजी होणार्या विशेष कार्यक्रमात प्रमाणपत्र, ट्रॉफी देण्यात येवून गौरविण्यात येणार आहे. प्रथम बक्षिस 700 रू. रोख आणि ट्रॉफी, द्वितीय 500 रू. आणि ट्रॉफी, तृतीय 300 रू. आणि ट्रॉफी, उत्तेजनार्थसाठी 200 रू. विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी शकुंतला अहिराव, डॉ. उज्वला राठी, शोभा साळी, क्षमा साळी, स्वाती काबरा, जयश्री पाटील, रश्मी दंडवते, प्रा. उज्वला देशपांडे, शशिकला पांडे, सपना शर्मा, मीना मानुधने, दर्शना तिवारी, निशा विंचुरकर, संध्या महाजन, आरती महाजन, वंदना पाटील, इंदिरा पाटील, छाया दाभाडे आदींनी परिश्रम घेतले. कृष्णा ओतारी मित्र मंडळाने मोटार सायकलींसह मोलाचे सहकार्य केले.