एरंडोल न्यायालयातर्फे जागतिक महिला दिन साजरा.

0

एरंडोल ( प्रतिनिधि) एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजी पंचायत समिती सभागृह एरंडोल येथे '' जागतिक महिला दिन '’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात अॅड श्री. एच.बी. पाटील यांनी "Sexual harassement of women at work place & Acid Attacks" , अॅड श्री. विलास के मोरे यांनी "Prohibition of child Marridage act" , अॅड श्रीमती चेतना कलाल यांनी " Protection of women from domestic violence act" तर श्री. विशाल धोंडगे, न्यायाधीश एरंडाेल यांनी " Dowry Prohibition act " या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे अॅड. श्री. के.जी.भाटीया आणि श्रीमती सुचिता चव्हाण तहसिलदार एरंडोल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्रीमती प्रतिभा पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. नितीन व्ही बेडिस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती बी. ए. तळेकर, दिवाणी न्यायाधीश एरंडोल, श्री.विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश एरंडाेल, श्रीमती सुचिता चव्हाण तहसिलदार एरंडोल, श्री. डी.ए.जाधव सचिव तालुका विधी सेवा समिती तथा गटविकास अधिकारी एरंडोल, श्रीमती उर्मिला बच्छाव संरक्षण अधिकारी, श्रीमती एस.एस.चौधरी बालविकास प्रकल्प अधिकारी, श्रीमती व्ही.एस.बडगुजर, श्रीमती एस.एस.पाटील, श्रीमती एस.यु.महाजन, सहा. सरकारी अभियोक्ता श्रीमती चेतना कलाल, अॅड. श्री. एम.ओ. काबरे अध्यक्ष तालुका वकील संघ एरंडोल, अॅड. श्री. एच.बी. पाटील, अॅड. श्री. विलास के. मोरे, अॅड श्री. के.जी.भाटीया, अॅड. श्री. आकाश महाजन व इतर विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस अंदाजे ८० जणांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!