तीन आमदारांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना १२ मार्च रोजी धुळे येथे पुरस्कार वितरण.. अमळनेर शहरातून अशपाक शेख यांना खानदेश भूषण पुरस्कार जाहीर.

अमळनेर(प्रतिनिधि) येथील आवास बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष अशफाक बशीरोदीन शेख यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय

कामगिरी बद्दल खानदेश भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आले धुळे येथील लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल संस्था यांनी ही निवड केली आहे
दिनांक १२ मार्च २०२३ रविवार रोजी धुळे शहरातील रुतराज हॉटेल येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर तालुक्यातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस नेते भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार डॉ फारूख शाह, मालेगांव शहराचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, यांच्या सह आदि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरशाद जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार कार्यक्रमाचे शुभारंभ जाहिद अब्दुल हक सर करतील तर प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल कय्युम सर, डॉ शब्बीर इक्बाल, इस्माईल सर, हाजी गुफरान सेठ, कार्यक्रमाचे संयोजक अन्सारी अब्दुल हाफिज अब्दुल हक, लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष अन्सारी अब्दुल जाहिद अब्दुल हक.