हाजी अजमल शाह यांना खानदेश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..

(24प्राईम न्यूज) धुळे येथे दि. १२/०३/२०२३ रोजी सकाळी १० वाजता लोकसेवा बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्व. अब्दुल हक यांची स्मरणार्थ धुळे शहरातील शानदार हॉटेल रितुराज रेल्वे स्टेशन समोर पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात हाफीज अब्दुल समी यांचे तिलाव ते कुरआने पाक ने झाली. प्रोफेसर खलील अन्सारी साहेबांनी नात ए कलाम सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक हाजी अब्दुल कय्युम सर हे होते. या कार्यक्रमात वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले.
यावेळी जळगांव शहराचे शाह समाजाचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते हाजी अजमल शाह अब्दुल्ला शाह यांना धुळ्याचे लोकप्रिय आमदार डॉ. फारूख शाह यांचे शुभहस्ते “खान्देश भुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तसेच श्री. शाह यांना जळगांवात देखील याच दिवशी मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन तर्फे “भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार मिळाला आहे..
हाजी अजमल शाह यांनी शाह समाजाला छप्परबंद विमुक्त जातीची शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी गेल्या ३०-३५ वर्षांपासून अथक परिश्रम घेवून अनेक प्रकारच्या चळवळी व आंदोलन, निवेदन व शासन दरबारी पाठपुरावा करुन एम. एम. शाह यांचे रूपाने संस्थेमार्फत विमुक्त जातीच्या शासकीय सवलती मिळवून दिलेल्या आहेत.
हाजी अजमल शाह आज विविध संस्थांमार्फत आपले सामाजिक कार्य अविरत करीत आहेत. तसेच पत्रकारितेमध्ये देखील त्यांची रूची आहे. श्री. शाह समाजाचे कैवारी, हितचिंतक व मागासवर्गीय क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. अजमल शाह यांना आजपावेतो सामाजिक कार्याचे विविध संस्थेकडू- एकुण ५ पुरस्कार मिळालेले आहे.