विटा भट्टी ते देवपुरला जोडणाऱ्या सुशी नाल्यावर पुलाचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन..!
गौसिया नगर विटाभट्टी ते शेरू मिस्तरी यांच्या घरापर्यंतच्या पुलामुळे वाहतुकीची सुविधा मिळणार..!

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील देवपुर भागातील सुशीनाल्यावर विटा भट्टी गौसिया नगर पासून लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता

व पूल नसल्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना सुमारे १ कि.मी. अंतरावरून पलीकडच्या भागात जावे लागत होते. यासंदर्भात या भागातील स्थानिक प्रभाग क्र.3 चे नगरसेवक सईद बेग,नसीर पठाण, गनी डॉलर यांनी एका निवेदनाद्वारे या नाल्यावर लोकांना रहदारीसाठी पुल व्हावा. अशी मागणी या भागातील नागरिकांची होती. त्याअनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी तत्काळ दखल घेत आपल्या स्थानिक आमदार निधीतून निधी मंजूर केला होता या पुलाचे आज रोजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते,गटार,पुल व पाण्याचे पाईप लाईन संदर्भातील मुलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने कोणताही भेदभाव न करता निधी उपलब्ध केला जात आहे. आजपर्यंतच्या आमदारांच्या कार्यकाळातील कामाचे व आमदार फारुख शाह यांच्या कार्यकाळातील कामाचे मूल्यमापन केल्यास आमदार फारुख शाह यांचे काम वरचढ होताना दिसत आहे. या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, कैसर अहमद, फातेमा अन्सारी, रफीक शाह, शहजाद मन्सुरी, समीर मिर्झा, महेबुबा शेख, प्यारेलाल पिंजारी, एकबाल शाह, आसिफ शाह, शोएब मुल्ला, जमील खाटीक, इब्राहिम पठाण, आसिफ मुल्ला, अकीब अली, जुबेर शेख, नजर पठाण, फिरोज शाह, शहेबाज शेख, ओसामा शेख, खालिद पिंजारी, गुलाब नबी पिंजारी. तौफीक शेख, समीर पिंजारी सिद्धीक शेख, माजीद काझी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.