काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निर्णयास विरोध करत कार्यकर्त्यांनी निदर्शने ….

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथे काँग्रेस चे नेते यांच्या वर भाजप सरकारने सूड बुध्दीने जे पाऊल उचलले व राहुल गांधी यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत असल्याने राहुल गांधींच्या अटकेच्या निर्णयाच्या विरोधात अमळनेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराणाप्रताप चौकात निदर्शने केली.
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुलोचना वाघ, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील ,डब्बिर पठाण, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे ,किसान काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रा सुरेश पाटील , डॉ अनिल शिंदे , शहराध्यक्ष मनोज पाटील , संदीप घोरपडे , शांताराम पाटील ,धनगर पाटील , ऍड प्रशांत संदानशीव , प्रा श्याम पवार , बी के सुर्यवंशी , अलिम मुजावर , बन्सीलाल भागवत गिरीश पाटील ,कैलास पाटील ,नितीन पाटील , तुषार संदानशीव आदींनी महाराणाप्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकार चा निषेध व्यक्त केला.