पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी स्व: खर्चातून शेरी गावातील शेत रस्ता तयार केला..

धरणगांव ( प्रतिनिधी ) जळगांव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांचा स्व .खर्चातून तयार होत आहे धरणगाव तालुक्यातील शेरी गावातील शेत रस्ताआज रोजी शेरी येथे सकाळी ९.०० वाजता शेतकरी बांधव यांना सोबत घेऊन मोटरसायकलीवर बसून शेरी येथे सुरू असलेल्या रस्त्याचे कामाचे पाहणी जि. प. सदस्य श्री. प्रतापरावजी पाटील यांनी केली हा रस्ता स्वःनिधीतून दिलेला असून रस्त्याची कामांची उत्तम प्रकारे सुरू आहे की नाही याची पाहणी आज प्रतापराव पाटील यांनी केली त्याबद्दल शेरी येथील सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी श्री. प्रतापरावजी पाटीलयांचे आभार मानले आहे.