४८९०७७ कोटी रकमेच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय प्रस्तावास शासन मान्यता… आमदार अनिल पाटील…

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यासह आजू बाजूच्या पाचं तालुक्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने आमदार अनिल पाटील विधान सभेत पोहोचल्या पासून या धरणाच्या निधी साठी सतत पाठपुरावा करत होते.
निम्न तापी पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी
सन 2022-23 च्या दरसुचिवर आधारित रु 4,890.77 कोटी एवढ्या किमतीचा

चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर राज्य वित्त विभागाची सहमती घेऊन त्यानंतर केंद्रीय जल आयोगाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होण्यास पात्र होईल असा लेखी खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अधिवेशनातील लक्षवेधीवर लेखी उत्तरात केला.
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण हे अमळनेरसह आजूबाजूच्या पाच तालुक्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने आमदार अनिल पाटील हे विधानसभेत पोहोचल्यापासून या रूरखडलेल्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत,महाविकास आघाडी शासन असताना त्यांनी 200 हुन अधिक कोटी रुपयांची तरतूद धरणासाठी करून आणल्याने धरणाच्या कामाला गती मिळाली होती,विद्यमान सरकारने धरणासाठी केवळ 100 कोटी तरतुद केल्याने तालुक्यातील जनतेत नाराजीचा सूर असताना याच अर्थसंकल्प अधिवेशनात आमदारांनी धरणाबाबत आक्रमक भूमिका घेत सूचना मांडून काही प्रश्न उपस्थित केले होते.यात आमदारांनी पाडळसरे प्रकल्प 25 वर्षांपासून रखडला असल्या
ने प्रकल्पाचा खर्च पाच पटीने वाढला आहे,याशिवाय प्रकल्प रखडल्याने दरवर्षी 10,000 दशलक्ष घनमीटर पाणी वाहून जाते,प्रकल्प पूर्ण झाल्यास 54936 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार तसेच जवजवड पाच तालुक्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणारा आहे आहे,तत्कालीन युती सरकारने नाबार्ड करून 1500 कोटी कर्ज उपलब्ध झाल्याची घोषणा केली होती,ती फसवी ठरली,आता या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाला प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याची गरज असल्याने यावर काय कार्यवाही करणार अशी सूचना आ.अनिल पाटील यांनी उपस्थित केली होती.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी असल्याने आणि त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांचे आमदार खा. राहुल गांधी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी सभागृहाचा त्याग करून सभागृहाबाहेर ठिय्या मांडून असल्याने या लक्षवेधीवर प्रत्यक्षात चर्चा होऊ शकली नाही.परंतु जलसंपदा मत्र्यांनी यावर लेखी खुलासा करताना म्हटले आहे कि सद्यस्थितीत सन 2022-23 च्या दरसूचीवर आधारित प्रकल्पाची चतुर्थ सुप्रमा प्रस्ताव रु 4,890.77 कोटी एवढ्या किमतीस राज्य तांत्रिक सल्लागार समितीची (एस एल टी ए सी) मान्यता घेऊन प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.सन 2012 सालच्या शासन स्तरावरील निर्देशानुसार पाणी उपलब्धतेनुसार सदर प्रकल्प दोन टप्प्यामध्ये करण्याचे नियोजन आहे.तप्पा 1 अंतर्गत येणार्या 25.657 हे लाभ क्षेत्रापैकी 85 टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण भागातील आहे,तसेच टप्पा 1 अंतर्गत 85 टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण क्षेत्रातील असल्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या नियमांनुसार 60 टक्के केंद्रीय वित्त साहाय्य मिळण्यास हा प्रकल्प पात्र असल्याचा स्पष्ट खुलासा जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे.