राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या धुळे शहर अध्यक्षपदी जमीरोदीन एस. शेख यांच्या कळे पदभार…

धुळे (प्रतिनिधि) राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या धुळे शहर अध्यक्षपदी जमीरोदीन एस. शेख यांच्या कळे पदभार सोपविण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष सलीम शेख (लंबू) यांच्या शिफारशीने प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. अनिल गोटे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रवादी भवन मध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक अ. लतिफ अन्सारी, अकबर अली सैय्यद सर ,जमीर शेख, विजय वाघ, रईस मन्सुरी, आबीद मनियार, अरशद शेख, भोला गोसावी, सादीक पठाण व पदाधिकारी,कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.