कृ उ बा समिती निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपन्न…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथे कूषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांची आज माजी आमदार आदरणीय दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात महाविकास आघाडीची स्थापना व आपल्य पक्षाची सर्वांगीण रणनीती याबाबत बंद चर्चा झाली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा पवार, शिवसेना (उबठा) जिल्हाध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे उपस्थित होते.

भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील हे वैद्यकीय कारणास्तव मुंबईत असल्याने त्यांनी फोनवरून उपस्थिती दर्शवली. यावेळी महाविकास आघाडीच्या संदर्भातील कॉपीराइट माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना अधिकार देण्यात आला होता
महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरावेत, त्यांची छाननी केल्यानंतरच वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांना उमेदवारी दिली जाईल.
आजच्या बैठकीला तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमळनेर मा.गोकुळाबा बोरसे,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर मा.शेटकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रा.सुरेश पाटील,माजी तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा. .ठा ग्रुप मा.विजय काशिनाथ पाटील,जिल्हा सरचितनीस काँग्रेस मा.संदीप घोरपडे सर,मा. यावेळी नगरसेवक मनोज पाटील, विक्रांत पाटील, श्याम पाटील, तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बाठा ग्रुप मा.श्रीकांत अनिल पाटील, अध्यक्ष बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी संस्था गणेश भामरे, भूषण पाटील ,आदी उपस्थित होते..