राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने युवा मित्र परिवारातर्फे सर्व पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले..

0

अमळनेर नगरी साठी मोठा बहुमान.

अमळनेर (प्रतिनिधि) मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ हा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आल्याने अमळनेर युवा मित्र परिवारातर्फे सर्व पत्रकार बांधवांचा विशेष फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
महाराणा प्रताप चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाने यांनी हा पुरस्कार म्हणजे अमळनेर नगरीसाठी मोठा बहुमान असल्याचे सांगत चांगल्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने हा पत्रकार संघ आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,सचिव चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच जेष्ठ पत्रकार संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,आर जे पाटील,अमोल पाटील,युवराज पाटील,महेंद्र पाटील,राहुल बहिरम,ईश्वर महाजन,नूर खान,बाबूलाल पाटील,श्यामकांत पाटील,आबीद शेख,मुन्ना शेख,संभाजी देवरे यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
तर सन्मानासाठी
यावेळी शिवसेनेचे(शिंदे गट) तालुका प्रमुख प्रथमेश पवार,पोलिस गोपनीय शाखेचे डॉ शरद पाटील तसेच अमळनेर युवा मित्र परिवाराचे रणजीत शिंदे, दिनेश तेवर, राहुल कंजर , योगैंद्र माळी, जगदीश महाजन , अमर पाटील ,प्रथमेश पवार, राहुल आहिरे, भावेश साळुंखे ,आकाश माळी, विकी चौधरी, प्रणव मणियार , मोनू महाजन , सुमित पाटील , सौरभ पाटील, सुनिल भोई,राजू चौधरी, मनोज शिंगाणे ,विजय चौधरी आणि राजुसिंग परदेशी उपस्थित होते.सदर सन्मानाबद्दल संजय पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!