जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न…

एरंडोल (प्रतिनिधि)येथील बुधवार दरवाजा परिसरातील श्रीराम चौक येथे जय श्रीराम प्रतिष्ठान एरंडोल व श्री अश्विनीकुमार नेत्रालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे आज १० एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी, उच्च प्रतीचा चष्मा , मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात १७५ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. तसेच ज्या रुग्णांना चष्मा, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया, डोळ्यातील लेन्स व विविध शस्त्रक्रिया या माफक दरात करणार आहेत. यावेळी माजी उपनगराध्यक्ष छाया आनंद दाभाडे, सामाजिक कार्यकर्ता आनंद दाभाडे, जया राजेश महाजन, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, ललित पाटील, डॉ. सुमेध महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिष्ठान तर्फे सतत सात वर्षापासून विविध आरोग्य विषयी शिबिराचेआयोजन होत असते .नेत्र तपासणीचे हे, पाचवे वर्ष आहे. शिबिरात शहरासह तालुक्यातील १७५ नागरिकांनी मोफत नेत्र शिबिराचा लाभ घेतला. यात उच्च प्रतीचा चष्मा मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांमधील लेन्स या माफक दरात श्री अश्विनी कुमार नेत्रालय यांच्यामार्फत करून देण्यात येणार आहेत.
सदर शिबिरासाठी सदानंद पाटील, ऋषिकेश महाजन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, जंगलु पाटील, शांताराम धुडकू महाजन, संजय महाजन, ज्ञानेश्वर पाटील, शशिकांत पाटील, भैय्या महाजन,आबा चौधरी ,ओम पाटील तसेच जय श्रीराम प्रतिष्ठानतील सर्व सदस्य, व परिसरातील सर्व नागरिक यांनी परिश्रम घेतले.