उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना राज्यस्तरीय “सेवा” पुरस्कार प्रदान..

महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झाले वितरण.
अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील रहिवासी तथा उपक्रमशील जि.प.शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांच्यातर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय सेवा पुरस्कार” नुकताच एरंडोल येथील हॉटेल कृष्णा इन येथे आयोजित एका कार्यक्रमात समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संदिप पाटील यांनी आतापर्यंत ढेकु खुर्द ता.अमळनेर,बिलवाडी ता.जळगाव या गावांमध्ये सेवा केली असून विद्यार्थ्यांसाठी शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,पढाई पे चर्चा,स्वच्छता सन्मान उपक्रम असे एक ना अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबिले आहेत.या उपक्रमांची दखल घेत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केल्याचे मानवसेवा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विक्की खोकरे यांनी सांगितले.कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,मुख्याधिकारी विकास नवाळे,ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.मोहन शुक्ला,माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, व इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.संदिप पाटील यांना यापूर्वी देखील विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.