आरपीआय(A) कामगारा आघाडीचे मिलिंद वानखेडे यांनी आदिवासी शिक्षिकेला दिला न्याय..

विक्रोळी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका, ट्रस्टी व शिक्षकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
मुंबई (प्रतिनिधी ) आदिवासी समाजाची शिक्षिका पुष्पा बागुल यांनी सेवाजेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर दावेदारी दाखल केल्यामुळे हरियाली व्हिलेज, टागोर नगर ,विक्रोळी मुंबई येथील महादेव उपाध्याय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ,ट्रस्टी व शिक्षक यांनी आपसात संगणमत करून पुष्पा बागुल यांची सेवाजेष्ठता नाकारली, इन्क्रिमेंट थांबवले, जाती वरून अपमानास्पद बोलून वेळोवेळी मानसिक छळ केला, नोकरी वरून काढण्याची धमकी दिली व पगार थांबविला अशी लेखी तक्रार आदिवासी समाजाच्या पीडित शिक्षका पुष्पा बागुल यांनी आरपीआय (ए) कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या कडे केली या तक्रारी वरून आर पी आय (A)राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने पीडित शिक्षिकेला न्याय देण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आरपीआयच्या शिष्टमंडळाने भेटी देऊन लेखी तक्रारी अर्ज दाखल केला. या अर्जावरून विक्रोळी पोलिस ठाणे पोलिसांनी महादेव उपाध्याय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन दुबे, ट्रस्टी गिरीजादेवी उपाध्याय , माजी मुख्याध्यापक अशोक सिंह ,शिक्षक सदाब्रुज सिंह यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा 2015 (ॲट्रॉसिटी )कलम 3(1 )(आर ), 3(1)(s), भादवि कलम 509 ,504, 506 ,34 प्रमाणे 10 एप्रिल 2023 रोजी विक्रोळी पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला . सदर प्रकरणात रिपब्लिकन पक्ष कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनला भेटी दिल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कामगार आघाडी ठाणे प्रदेश सचिव कुशल निकाळे ,प्रदेश कार्यालय सचिव नितीन उघडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भालेराव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता सदर महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे पीडित आदिवासी महिला शिक्षिका पुष्पा बागुल यांनी आभार मानले