स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत मराठी हास्य कवी संमेलन आणि मराठी गझल मुशियारा या कार्यक्रमाचे आयोजन..

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर शहरातील साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे दिनांक 15 व 16 एप्रिल रोजी दोन दिवशीय स्मृती

व्याख्यानमाले अंतर्गत मराठी हास्य कवी संमेलन आणि मराठी गझल मुशियारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ देखील पार पडणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली यासंदर्भात पत्रकारांना माहिती देण्यासाठी वाचनालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश वाघ व कार्यकारिणी सदस्य ईश्वर महाजन उपस्थित होते ग्रंथालयाच्या वतीने खानदेश स्तरीय पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ प्राध्यापक पीएच बारी यांनी दिलेल्या दिंडीतून टिळक स्मारक समिती जुना टाऊन हॉल येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.