प्रभारी प्राचार्य हर्षल जोशी एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित..

0


एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल येथील मुळ रहिवासी तथा माणगाव (जि.रायगड) येथील जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटी संचालित टीकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य हर्षल जोशी याना नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ऍण्ड मॅनेजमेंट या संस्थेतर्फे “आशिया पॅसिफिक एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.नवी दिल्ली येथे केंद्रीय सचिव एच.एस.रावत यांच्याहस्ते प्राचार्य जोशी याना पुरस्कार देण्यात आला तसेच इंडियन सॉलीडेरीटी कॉन्सिल यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय विद्या गौरव गोल्ड मेडल पुरस्कार देखील प्राचार्य जोशी याना देण्यात आला.यावेळी डॉ.कमल जैन,डॉ.गौरव गुप्ता,डॉ.मेघा वर्मा यांचेसह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.प्रभारी प्राचार्य हर्शल जोशी याना यावर्षीचा माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते भरतशेठ गोगावले यांचेहस्ते देण्यात आला आहे.
प्रभारी प्राचार्य हर्शल जोशी यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.प्रभारी प्राचार्य हर्शल जोशी सुमारे पस्तीस वर्षांपासून शिक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत.प्राचार्य जोशी यांनी रक्तदानाबाबत समाजात जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी स्वत:च्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान केले आहे.महाविद्यालयातर्फे आरोग्य तपासणी,प्लास्टिक मुक्त भारत अभियानात सहभाग,कोरोना काळात सफाई कामगार,घंटागाडीचालक,आदिवासींना मास्कचे वाटप,मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर,कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार,विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन आदी विविध उपक्रम राबवले आहेत.प्रभारी प्राचार्य एरंडोल येथील रहिवासी असून ‘सकाळ’चे तालुका बातमीदार आल्हाद जोशी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.प्रभारी प्राचार्य हर्शल जोशी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब सावंत,सचिव नानासाहेब सावंत,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रामदास पुराणिक,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड.किशोर काळकर,किर्गीस्तानचे भारतातील मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांचेसह प्राध्यापक,विविध शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!