१९५१ नंतर अमळनेरात ९७ वें मराठी साहित्य संमेलन रंगणार… सरकार कडून ५० लक्ष चा मिळणार निधी.

अमळनेर ( प्रतिनिधि )
९७ वे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार हे नशचित झाल्याने अमळनेर करान मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले मराठी साहित्य संमेलनाच्या समेलनाच्या नियोजनसंदर्भात पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते, यावेळी सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते. समेलनाबाबत अधिक माहिती देताना डॉ. जोशी म्हणाले की 1951 नंतर पुन्हा अमळनेरात हे संमेलन होतेय याचा आनंद आहे, यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू होते, सातारा आपल्या स्पर्धेत होते, परंतु स्थळ पाहणी समितीला अमळनेरचे नियोजन योग्य वाटल्याने त्यांनी आपली बाजू लावून धरली होती. अखेर महामंडळाने आपल्यालाच संधी दिली आहे. नियोजनात संमेलनाचे तीन केंद्र असणार असून प्रामुख्याने संमेलन स्थळ , निवास व्यवस्था व स्वछता गृह, दळणवळण विचारात घेतले आहे, अमळनेरात सर्व हॉटेल मिळून 100 रूम उपलब्ध असणार आहेत, सर्व मंगल कार्यालय मिळून 1500 ते 2500 लोकांची सोय होऊ शकते, काही व्यवस्था धुळे येथील देखील करण्याचे नियोजन आहे. भोजन व्यवस्थेत पंच पक्वान्न न ठेवता खान्देशी फेव्हर असणार आहे, याशिवाय खान्देशी बोली भाषा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर यांची थीम संमेलनात असणार आहे . सरकार कडून 50 लक्षचा मिळणार निधी
या संमेलनासाठी खर्च खूप मोठा असून शासनाकडून 50 लक्ष मिळण्याची तरतूद असली तरी 2 कोटी पर्यंत निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे, तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या निधीतुन काही निधी मिळू शकेल, याशिवाय तिन्ही जिल्ह्यातील संस्था, इंडस्ट्रीज यांच्यासह काही लहान दात्यांकडून यथाशक्ती मदत घेऊन 2 ते अडीच कोटी निधी जमा होऊ शकतो, निधी घेताना प्रत्येकाला पावती दिली जाईल, तसेच या कामी स्थानिक प्रशासनास सहभागी करणार असून प्रताप कॉलेज नेही मोठी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे, आज ढोबळ नियोजन केले असून सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत अंतिम नियोजन केले जाईल अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.