बाल आरोग्य तपासणी शिबिरात 55 बालकांना मोफत औषधी वाटप..

जरंडी,( साईदास पवार) बाल आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत जरंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या तपासणी शिबिरात 55 बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी

वाटप करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी केले याप्रसंगी या शिबिराचे आयोजक संजय शहापूरकर यांनी सांगितले की कुपोषण कमी करण्यासाठी वीस वर्षापासून सातत्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यातील कुपोषित बालकांना मोफत औषधी वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे त्यामुळे अनेक बालके साधारण श्रेणीत आली आहे
या नंतर पाच गावातील अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी प्रियदर्शनी पवार यांनी केली त्यानंतर संजय शहापूरकर यांच्या हस्ते मोफत औषधी वाटप करण्यात आले
या शिबिराला पर्यवेक्षिका साईवर हर्षल विसपुते निलेश वानखेडे ईश्वर निकम श्रीराम चव्हाण वानखेडे सिस्टर
डाया पाई पायल प्रसन्नजीत पाटील व शिल्पा ठाकूर यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.