सोयगाव तहसीलवर बनोटी च्या विधवा महिलांचा मोर्चा;; केंद्राच्या योजनेचा संजय गांधी श्रावण बाळ लाभ मिळेना..

जरंडी (साईदास पवार).केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे श्रावण बाळ, निराधार, व अपंग लाभार्थ्यांना दहा महिन्यापासून वेतन मिळाले नाही त्यासाठी मंगळवारी (ता.२५)बनोटीच्या निराधार व विधवा महिलांचा मोर्चा दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयावर धडकला होता बनोटी परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस महिलांनी नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांना मागणीचे निवेदन दिले दरम्यान या मधील काही लाभार्थ्यांचे निराधार योजनेचा सुरू असलेले मानधन बंद करण्यात आले आहे तर दहा महिन्यापासून निराधार व विधवा महिलांना मानधन मिळालेलं नसल्याचे मोर्चा तील सहभागी महिलांनी सांगितले दरम्यान ग्रामपंचायत सदस्य मलखान चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा धडकला होता ग्रामीण रुग्णालय पासून सुरू झालेला मोर्चा थेट तहसील वर धडकला यावेळी निराधार महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाकडून मिळणारे विधवा निराधार महिलांना संजय गांधी,श्रावण बाळ योजनेचे मानधन दहा महिन्यापासून मिळत नाही त्यातच लाभार्थी असलेल्या गोर गरीब महिलांच्या हातांना काम नसून यातील अनेक लाभार्थी वृद्ध आहे त्यामुळे त्यांची उपास मार होत आहे दुसरीकडे या लाभार्थी महिलांना उदर निर्वाहा साठी कोणतेही उत्पन्न हाती नाही त्यांचा या मानधन वर उदर निर्वाह भागतो त्यामुळे या विधवा व निराधार महिलांची कुचंबणा होते आहे बँकेत गेल्यावर बँकेचे अधिकारी थेट तहसील कार्यालयात जाण्याचा सल्ला देतात त्यामुळे लाभार्थ्यांना बँक आणि तहसील च्या पायऱ्या झिजव्या लागत आहे.दहा दिवसांत मानधन खात्यात वर्ग न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी गीताबाई जाधव, हिराबाई राठोड, दुबला बाई राठोड, यमुनाबाई जाधव, कला बाई खरात, मंगला बाई बाविस्कर, सखुबाई जाधव, माली बाई राठोड, यांचेसह शेख गुलाब अहमद मलखान चव्हाण यांनी या मोर्चा चे नेतृत्व केले…..