जागतिक पुस्तक दिवस साजरा..

एरंडोल ( प्रतिनिधि ) शास्त्री इन्स्टिटूट ऑफ फार्मसी पळसदल ता एरंडोल जि. जळगाव या महाविध्यालयच्याच्या वतीने २५-०४-२०२३ मंगळवार रोजी ग्रंथालयामार्फत जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विधार्थी उपस्थित होते या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनात विविध प्रकारच्या लेखकांचे पुस्तके ठेवण्यात आली होती . या पुस्तक प्रदर्शनचे उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले . सरानी या जागतिक पुस्तक दिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना २३ मार्च रोजी हा दिवस विल्यम शेक्सपिअर मिगुएल सर्व्हटिस आणि इंका गार्सिलियो यांच्या सह जगातील ख्यातमान व्यक्तीचा या दिवशी मृत्यू झाला व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस पुस्तक दिवस म्हणून साजरी करण्याचे युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक दिवस म्हणून घोषित केले . हा दिवस सर्वात प्रथम २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्याने साजरी केला अशी माहिती देत मनोगत व्यक्त केले . तसेच जागतिक पुस्तक दिनाचे महत्व सांगून जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे होईल हे सांगितले , तसेच ग्रंथपाल सौ. सरिता भोई यांनी मुलांना ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांबद्दल माहिती व मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिना मोरे यांनी केले व कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास श्री. शेखर बुंदेले याचे योगदान लाभले