चक्क पोलिसालाच घ्यावी लागली आपत्कालीन सेवेची मदत-सोयगाव पोलीस ठाण्यातील प्रकार..

जरंडी (साईदास पवार) सर्वसामान्य जनतेसाठी राज्यातील गृह विभागाने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन पोलीस सेवा डायल( ११२) ,सुरू करण्यात आली आहे परंतु शनिवारी चक्क सोयगाव पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला च या सेवेची मदत घेण्याची वेळ आली अन ती मदत तत्पर मिळलीही
सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्रीकांत घागरे यांच्या घरी छत्रपती संभाजी नगरला त्यांचे वृद्ध वडील घरी एकटेच असताना त्यांच्या घरात अचानक अज्ञातांचा मोब जमला व या मोब कडून त्यांच्या वडीलांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ करू लागला त्यावेळी सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई हे सुद्धा जनतेचा रक्षणासाठी सोयगाव पोलीस ठाण्यात अवकाळीच्या पावसाच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी कर्तव्य बजावत होते पोलीस श्रीकांत घागरे यांचे वडील संकटात असताना त्यांना काहीच सुचत नव्हते अखेर त्यांना पोलिसांच्या आपत्कालीन सेवेची आठवण होताच त्यांनी ११२ वर डायल करून आपत्कालीन पथकाला मी सोयगाव पोलीस ठाण्यातून श्रीकांत घागरे बोलतोय असे म्हणतात आपत्कालीन पथकही अचंबित होऊन काय सेवा हवीय अशी चौकशी करू लागले त्यावेळी त्यांनी वडिलांवर आलेला बाका प्रसंग सांगितला व छत्रपती संभाजीनगर चे आपत्कालीन पथक सात ते आठ मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहचून त्यांनी मदत दिली….