मनसेच्या सोयगाव शहर अध्यक्षपदी दत्तात्रय काटोले तर उपशहर अध्यक्षपदी दीपक बागुल

जरंडी (साईदास पवार).
सोयगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्षपदी दत्तात्रय काटोले तसेच उपशहर अध्यक्षपदी दीपक बागुल यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर यांनी शुक्रवारी (ता.२८) नियुक्ती पत्र देऊन केली आहे.
पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी नगर येथील कार्यालयात जिल्हा अध्यक्ष वैभव मिटकर यांनी
सोयगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्षपदी दत्तात्रय काटोले तर उपशहर अध्यक्षपदी दीपक बागुल यांच्या नियुक्तीचे पत्र दिले.यावेळी शहराध्यक्ष गजानन गौडा पाटील,आशीषजी सुरडकर,सोयगाव तालुकाध्यक्ष रामा एलीस,माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.