अमळनेरात पुन्हा दोघांवर चाकू हल्ला.. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

बिल देण्याच्या किरकोळ कारणावरून एकाने दोन मित्रांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, ऋषिकेश श्याम सोनार (22, रा. पैलाड अमळनेर), तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिकजवळील एका देवीचे दर्शन घेऊन परत अमळनेर येथे आले. ते त्यांच्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यात ऋषिकेश सोनार यांच्यावर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी आहे. धुळे सिव्हिल ला बेशुद्ध आहे. तेजस पाटील जखमी आहे दादू पाटील हा मुख्य आरोपी असून त्याला त्याचा मित्र दीपक बोरसे याने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणले आहे. घटना कशी आणि का घडली
तपास करत आहेत. जखमी तरुण शुद्धीवर आल्यानंतर घटनेचा तपशील समोर येईल. पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस पथक कसून तपास करत आहेत.