सुप्रीम कोर्टाच्या आदेशा चे मनियार बिरादरीने केले स्वागत..

जळगाव. (प्रतिनिधि )
बार असो सोबत केला जल्लोष
द्वेष पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,कोणाच्याही तक्रारीची वाट पाहू नका,जर सरकारने व संबंधित पोलिसांनी तक्रार दाखल केली नसल्यास तो विलंब न्यायालयाचा अवमान ठरेल अशा आशयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने काढताच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने त्या आदेशाचे स्वागत करून जल्लोष केला.
वकील संघा सह जल्लोष
सुप्रीम कोर्टाच्या आदेश झाल्यानंतर जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने एकत्रित येऊन सर्वप्रथम ईश्वराचे आभार मानून सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन केले व एकमेकांना मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.तेथून सर्व कार्यकर्ते हे जळगाव येथील न्यायालयात गेले व न्यायालयात जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे सचिव एडवोकेट स्वप्निल पाटील, जिल्हा सरकारी वकील एडवोकेट सुरेंद्र काबरा , माजी सचिव बार असोसिएशन एडवोकेट सु
भाष तायडे व बार असोसिएशनचे क्रियाशील सदस्य एडवोकेट शरीफ पटेल यांना सुद्धा प्रातनिधिक स्वरूपात मिठाई देऊन माननीय न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले..
कानुन अंधा होकर भी जिंदा हैं – फारुक शेख

न्यायालयात उपस्थित वकिलांना सुद्धा पेढे भरविण्यात आले यावेळी फारुक शेख यांनी वकिलांसमक्ष नमूद केले की जरी कानून अंधा होता है असे म्हटले जात असले तरी कानून अंधा होने के बावजूद कानुन जिंदा है.हे माननीय न्यायालयाने आपल्या विविध निकालावरून सिद्ध केलेले आहे. न्यायालय व न्यायाधीश हे राजकीय नाही त्यांची बांधिलकी फक्त राज्यघटनेशी असते अशावेळी राज्यातील काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व धार्मिक नेते सुद्धा द्वेष पसरवीणारी भाषा करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष हा त्वरित गुन्हे दाखल करीत नसल्याने त्या नेत्यांचे फावते म्हणून माननीय न्यायालयाच्या आदेशाने आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील अन्यथा कोर्टाच्या अवमानाला सामोरे जावे लागेल.
*जनतेला आवाहन+
म्हणून सर्वसामान्य जनतेने याची नोंद घ्यावी व आपल्या आजूबाजूला होत असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाद्वारे कोणत्याही समाजाच्या राजकीय वा धार्मिक नेत्यांनी द्वेष पसरवणारी भाषेचा वापर केल्यास त्वरित त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात तक्रार द्यावी किंवा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा मणियार बिरादरीने केलेले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख, शहराध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर, कार्यकारी संचालक अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, रफिक शेख, अख्तर शेख, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान व रहीम शिकलगार, वसीम शेख, जुबेर युसुफ,सुलतान शेख, सैयद अब्रार,सैयद अनिस, मुस्तकिम शेख,आसिफ शेख आदी उपस्थित होते.