सरपंच परिषदेच्या उतर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ सुषमाताई यांची निवड…

अमळनेर (प्रतिनिधि) सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांची त्यांनी केलेल्या गाव विकास ,महिला.

सबलीकरण तसेच गावपाणी पुरवठा व शिक्षण ह्या विषयात विशेष केलेल्या कामाची दखल घेत व त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची दखल सरपंच परिषदेने घेवून सौ सुषमा ताई यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केली.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे हस्ते विशेष कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्याकडून शिर्डी येथे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते सौ सुषमा ताई देसले यांची बाजार समिती संचालक पदी नुकतीच निवड झाल्याने त्यांचा सत्कार ही करण्यात आला. त्यामुळे सौ सुषमाताई यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे..