पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याना दिलासा.

24 प्राईम न्यूज 13 May 2023 इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला. तसेच इम्रान यांच्याविरोधात ९ मेनंतर दाखल करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकरणात त्यांना १७ मेपर्यंत अटक करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. अन्य एका याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हा आदेश दिला.
दरम्यान, या सुनावणीदरम्यान एका वकिलाने इम्रान यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज काही काळ स्थगित करावे लागले. न्या. मियाँगुल हसन औरंगजेब आणि न्या. समन राफत इम्तियाज यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.