अमळनेर येथील शारदा कॉलनी परिसरात दोन वाहनांनी घेतला अचानक पेट!

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरातील शारदा कॉलनी परिसरातील वड चौक येथे आज दि १७ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ओमनी व तीनचाकी रिक्षाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी घटनास्थळी नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे पथक लागलीच दाखल झाले होते. या आगीत दोन्ही वाहनांचे व एका घराचे विजेच्या मीटरने पेट घेतला होता. हि आग रोखण्यासाठी नगरसेवक प्रताप शिंपी, शरद पाटील व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली होती.