प्रभाग क्रमांक १९ मध्ये फरोग हाजी यांच्या घरापासून ते हाफिज इस्तियाक आणि दस्तगीर शेख यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता व गटार करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

धुळे(अनिस अहेमद ) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला

होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.हाफिज सिद्धिक नगर परिसरातील नागरिकांची सोई सुविधांच्या आभावी प्रचंड परवड होत होती.नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियानअंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये फरोग हाजी यांच्या घरापासून ते हाफिज इस्तियाक आणि दस्तगीर शेख यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता व गटार करणे
त्याचे आज आ.फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सिद्धीक नगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ.शाह यांच्या सोबत डॉ.दीपष्री नाईक,डॉ.पवार, प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,युसुफ पापासर सउद सरदार, अजहर सय्यद,शाहिद शाह,उद शब्बीर अन्सारी, अकील अन्सारी, मौलाना शोएब, जलील फराद, हसन अन्सारी, सलीम अन्सारी, इस अन्सारी, आसिफ अन्सारी, शेख अखिल, वसीम मनियार, इस्तीयक हफिजी आदी उपस्थित होते.रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी यांनी समाधान व्यक्त केले आणि आ.फारुख शाह यांचे आभार मानले.