एरंडोलला आज कुस्तीगीरांचा गुणगौरव सत्कार..

0


एरंडोल (प्रतिनिधी) – येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या माध्यमातून कुस्तीगीरांनी प्रशिक्षण घेवून 2022-23 या वर्षात घवघवीत यश मिळवून संस्थेचा, एरंडोल तालुक्याचा तसेच जळगांव जिल्ह्याचा आणि नाशिक विभागाचा नावलौकिक वाढविला तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा देखील लौकिक वाढविला. अशा सर्व कुस्तीगीर खेळाडूंचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक़्रम शनिवार दि. 27 मे 2023 रोजी सायं. 5.30 वाजता ढोलू महाजन नगर, मोबाईल टॉवरजवळ, अमळनेर दरवाजा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्याचे आमदार चिमणराव आबा पाटील अध्यक्षस्थानी राहणार असून प्रतिमापुजन पोलिस निरीक्षक सतिष गोराडे यांचे हस्ते तर दीपप्रज्वलन भाजपा जनजातीय प्रदेश समन्वयक अ‍ॅड. किशोर काळकर, न.पा. एरंडोलचे प्रशासक विकास नवाळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उल्लेखनिय कामगिरी करणार्‍यांचा सत्कार करण्यात येणार असून मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
यांचा होणार सत्कार :- योगेश्वरी मराठे, प्रेरणा मराठे, यामिनी आरखे, प्रांजल पाटील, भूषण आरखे तसेच नयन आरखे, चेतन सोनवणे, सुजल भोई, पियुष मराठे, साई पाटील, राम पाटील, भावेश आरखे, कल्पेश पाटील, दर्शन पाटील, कुणाल कुंभार. कार्यक़्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष भानुदास आरखे, सचिव अनिल मराठे, पंकज पाटील, ऋषीकेश पाटील, दिलीप सोनवणे, दुर्गादासा वानखेडे, आणि सदस्य परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!