१४ वर्षा आतील मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन उप विजयी..

जळगाव ( प्रतिनिधी )
मनपा स्तरीय सुब्रोतो फुटबॉल चषक आंतर शालेय १४ वर्षातील मुलांच्या अंतिम सामन्यात पोदार स्कूलने ओरियन सीबीएससी चा ४-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकविले.
विजेते व उपविजेते संघाला स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे चषक प्रदान करण्यात आले.
सदर चषक जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण तसेच महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक प्रशांत नाईक व जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रशांत नाईक यांनी मनपा या पुढे संपूर्ण पणे स्पर्धांना सहकार्य करेल असे आश्वासन दिले तर जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व पटवून दिले.
संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी प्रास्ताविकाद्वारे सतरा संघांचा आढावा सादर केला तसेच १७ वर्षीय मुलांच्या गटात स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत सुद्धा एकूण २३ संघांचा सहभाग असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोदारच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती छाया चौधरी तर आभार प्रदर्शन क्रीडा प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांनी मानले
खेळले गेलेले सामने व त्याचा निकाल
*अँग्लो उर्दू वि. वि सेंट टेरेसा
१-०
*पोद्दार वि. वि सेंट जोसेफ
३-०
*ओरियनCBSE वि. वि मिलत उर्दू ६-०
*पोद्दार वि. वि सेंट लॉरेन्स
५-०
*एल.एच.पाटील वि. वि एकरा शाहीन २-०
*के.टी.झांबरे वि. वि अँग्लो उर्दू २-०
उपांत्य फेरीचे सामने
*ओरियन CBSE वि. वि ल.एच.पाटील २-०
*पोद्दार वि. वि ए.टी.झांबरे
६-०
*अंतिम सामना
पोद्दार वि. वि ओरियन CBSE ४-०
*उत्कृष्ट खेळाडू दोन्ही जुडवे बंधू*
निशांत सराफ ८ गोल निल सराफ ८ गोल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे दोन्ही जुळवे बंधू यांना फारुक शेख यांनी घोषित करून त्यांचा गौरव करण्यात आले