कंत्राटी कामगारांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? मनसेचा सवाल..

24 प्राईम न्यूज 10 Aug 2023
. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी अनेक दिवस मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. बेस्टच्या या कामबंद आंदोलनाचा सामान्य मुंबईकरांना फटका बसला होता. परंतु कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर ८ ऑगस्ट रोजी हे आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून काही मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन मिळाल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. परंतु मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी कामगारांची दिशाभूल झाल्याचा आरोप केला आहे.