एरंडोल बसस्थानक आवारात घाणीचे साम्राज्य..!

एरंडोल (प्रतिनिधि) बसस्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारा नजिक संरक्षण भिंतीला लागून प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक च्या पिशव्या(कॅरी बॅग), कचरा, कागदे, रिकामी शहाळे,उर्वरित खाद्यपदार्थ व सांडपाणी आदी वस्तू संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या भागातील अतिक्रमित विक्रेते बसस्थानकाच्या आवारात रोज टाकत असतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे हे ठिकाण डुकरांचे नंदनवन बनले आहे.
बसस्थानकातील या घाणीमुळे प्रवाश्यांना कुबट वास येत असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बसस्थानक हे प्रवाश्यांसाठी स्वच्छता व सोई सुविधा पुरविण्याचे ठिकाण असताना प्रवाश्यांना व शाळकरी मुलांना या घाणी चा त्रास नाहक सहन करावा लागतो.
विशेष हे की, परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी देखिल केलेली आहे.
अतिक्रमण करून स्वतः कमाई करायची व घाण स्थानकाच्या आवारात टाकायची या प्रकाराला कायमचा आळा बसवावा अशी प्रवाश्यांची मागणी आहे.