महिला हाऊसिंग पदाधिकाऱ्यांची झाली नगरपरिषदेत बैठक.. -केलेल्या कामांचा मांडला आढावा,पुढील कामांचेही झाले नियोजन..

0

अमळनेर(प्रतिनिधि)शहरात गेल्या सहा वर्षांपासून अमळनेर शहरात जनहीताची कामे करीत असलेल्या महिला हाऊसिंग पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच नगरपरिषदेत बैठक संपन्न झाली.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आतापर्यंत ट्रस्ट ने केलेल्या कामांचा आढावा मांडण्यात आला तसेच पुढील कामांचेही नियोजन करण्यात आले.सदर बैठकीसाठी गुजरात हाऊसिंग ट्रस्ट च्या ब्रिजल ब्रह्मभट आणि सिराज भाई यांची विशेष उपस्थिती होती तर बैठकीस उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड व प्रशासन अधिकारी संजय चौधरी उपस्थित होते.गुजरात हाऊसिंग ट्रस्ट 6 वर्षांपासून अमळनेर येथे कार्यरत असताना शहर हागणदारी मुक्त करणे,क्लायमेंट चेंज व वॉटर मॅनेजमेन्ट,अंबरीश टेकडीवर जलशुद्धीकरण, विहीर पुनर्भरण,वृक्षारोपण,आदि कामे केल्याचा आढावा मांडण्यात आला,अमळनेर नगरपरिषदेच्या सहकार्याने ही सर्व कामे झाल्याची माहिती हाऊसिंग ट्रस्ट च्या विकासिनीनी दिली.तसेच नगरपरिषदेशी जुळण्याआधी आम्हाला पालिका म्हणजे काय?पालिकेचे काम काय? हे माहीत नव्हते मात्र पालिकेसोबत जुळल्यापासून आम्हाला नगरपालिका आणि नगरपालिकेचे कामही कळल्याचे विकासिनींनी सांगितले.त्यांच्या कामकाजाचे मुख्याधिकारी यांनी कौतुक केले.या बैठकीत योगिता मालुसरे,निकिता गाडीवाला,उषा गजरे, आशा भोई,जयश्री जाधव,ज्योती सणस,संपूर्ण महिला हाऊसिंग टीम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!