सौरमालेच्या उत्पत्तीची रहस्ये उलगडणार!

24 प्राईम न्यूज 25 Aug 2023
चांद्रयान- ३ मोहिमेंतर्गत लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत. यामुळे सौरमालेच्या उत्पत्तीशी संबंधित इतर रहस्ये जाणून घेण्यास मदत होईल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आययूसीएए) चे शास्त्रज्ञ प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितले. प्रा. त्रिपाठी म्हणाले की, पाणी हे जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आढळून आल्यास तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करता येईल. भविष्यातील मोहिमांमध्ये याची खूप मदत होईल. आयआयटी जोधपूर येथील प्रा. डॉ. अरुण कुमार म्हणाले की, या मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपाची क्रिया शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींशी संबंधित अभ्यासही केला जाणार आहे.