पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे “मदर तेरेसा जयंती”उत्साहात साजरी.

एरंडोल ( प्रतिनिधि ) पोदार इंटरनॅशनल स्कूल परिसरात मदर तेरेसा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य गोकुळ महाजन यांनी मदर तेरेसा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.
या प्रसंगी पोदार स्कूलचे विद्यार्थी अंजली सपकाळे, सिद्धेश पाटील, पार्थ पवार, मानसी पाटील, पार्थ जोशी यांनी मदर तेरेसा यांच्या जीवन चरित्रावर आपली मनोगते व्यक्त केली .
विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ. सोनाली फिरके यांनी मदर तेरेसा यांच्या आत्मचरित्रावर सविस्तर माहिती दिली. दैनंदिन परिपाठाच्या समयी शाळेच्या प्रांगणात उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी पोदार स्कूल चे उप- प्राचार्य दीपक भावसार, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.