” पांढरे हत्ती काळे दात ” एम . ए . मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट..

एरंडोल ( कुंदन ठाकुर)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावच्या एम.ए.मराठी अभ्यासक्रमात वाङ्मय प्रकार – कादंबरी या अभ्यासक्रमात विलास मोरे यांच्या ” पांढरे हत्ती , काळे दात ” या कादंबरीचा सामावेश दुसऱ्या सत्रासाठी करण्यात आला आहे .
तसेच त्यांचा ” चैत्र पालवी ” हा कविता संग्रह विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास – कविता या अभ्यासक्रमासाठी संदर्भ कविता संग्रह म्हणून समावेश करण्यात आलेला आहे .
नव्याने सुरू झालेला ” . मराठी साहित्य आणि चित्रपट ” या अभ्यासक्रमात विलास मोरे यांची भूमिका असलेला आधारवड या चित्रपटांसोबत पिंजरा, फॅन्ड्री ,जोगवा व जयंती या चित्रपटांचा संदर्भ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे . पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीला म . सा . प . मुख्य शाखा पुणे , म . सा प . पुणे शाखा जामनेर व नायगाव, नांदेड येथील कै . केवळबाई मिरेवाड स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे . महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे . अँड मोहन बी शुक्ला, प्राचार्य एस आर पाटील , प्रा रमेश माने , अमित दादा पाटील, विजय जाधव , संजय जाधव , नारायण मोरे , पंकज काबरा यांचे सह स्थानिक मान्यवरांनी विलास मोरे यांचे अभिनंदन केले आहे
——O—– . .