चंद्रावर “शिवशक्ती पॉइंट”मोदींची घोषणा.. -२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन.

0

24 प्राईम न्यूज 27 Aug 2023

चांद्रयान- ३ चा विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरला, त्याचे ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नामकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. चांद्रयान २ मोहिमेतील लँडर चंद्रावर उतरताना ज्या ठिकाणी अपघातग्रस्त झाला, ती जागा ‘तिरंगा पॉइंट’ नावाने ओळखली जाईल. तसेच चांद्रयान- ३ चंद्रावर उतरले तो २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असेही मोदी यांनी जाहीर केले.

चांद्रयान- ३ चंद्रावर उतरले, त्यावेळी मोदी ब्रिक्स संघटनेच्या शिखर बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग आणि तेथून ग्रीस दौऱ्यावर गेले होते. ग्रीसमधील अथेन्स येथून मोदी यांनी शनिवारी थेट बंगळुरूला येऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला भेट दिली आणि चांद्रयान- ३ मोहिमेच्या घवघवीत यशाबद्दल शास्त्रज्ञांचे भरभरून कौतुक केले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मोदी यांना मोहिमेच्या तपशिलांची माहिती दिली. चंद्रावर यान उतरल्याच्या ठिकाणाचे नामकरण करण्याची जगभरात पद्धत आहे. त्यानुसार भारतानेही आता चंद्रावर आपली कायमची मुद्रा उमटवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!