भारतीय बौद्ध महासभेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र अटकाळे सचिव पदी संघरत्न दामोदरे तर कोषाध्यक्षपदी महेंद्र वानखडे यांची निवड..

रावेर( शरीफ शेख)
जिल्हा शाखेच्या आदेशाने खालील प्रमाणे नियोजन करून जिल्हाकार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका कार्यकारणीची निवड
आज दिनांक 27/08/2023 रविवारी दुपारी बारा ते दोन या कालावधीत तक्षशिला बुद्ध विहार रावेर या ठिकाणी बैठक संपन्न झाली,या बैठकिला सर्वच तालुक्यातील आजी-माजी , पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, तथा जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहरातील, तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्यासंखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र वानखेडे गुरुजी, सरचिटणीस आदरणीय आनंद ढिवरे सर , तसेच मेजर रमेश सावळे, केंद्रीय शिक्षक आद. ए.टी.सुरडकर गुरुजी, जिल्हा संस्कार सचिव सुरेश जोहरे, जिल्हा संघटक विजय अवसरमल, साहेबराव धुंदले,जिल्हा कार्यकारणीच्या विचार विनिमया अंती या ठिकाणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली. तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे करण्यात आली रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र मधुकर अटकाळे, सरचिटणीस संघरत्न मोहन दामोदर, कोषाध्यक्ष महेंद्र गोपाल वानखेडे, उपाध्यक्ष संस्कार विभाग गौतम बन्सी अटकाळे, उपाध्यक्ष पर्यटन प्रचार विजय रघुनाथ भोसले, उपाध्यक्ष संरक्षण संतोष तायडे, हिशोब तपासणीस प्रा. रमेश वाघ, कार्यालयीन सचिव सदाशिव नारायण निकम, सचिव संस्कार मनोहर टोपलू ससाणे, राजेश सूरदास, सचिव पर्यटन प्रचार प्रवीण पंडीत धुंदले, विनोद तायडे, सचिव संरक्षण रितेश निकम, महेंद्र तायडे, संघटक नितीन अढांगळे, अमर गाढे, विजय काशिनाथ अवसरमल, पंडित महाले, मनोज गाढे अशी सर्वानुमते निवड करण्यात येऊन एकूण एकवीस पदे या ठिकाणी निवड करण्यात आली.
शेवटी शुभेच्छा पर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे सर, जिल्हा संघटक विजय अवसरमल यांनी नवनियुक्त कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे, जिल्हा कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग मेजर रमेश सावळे, जिल्हा सचिव सुरेश जोहरे, जिल्हा संघटक विजय अवसरमल, साहेबराव धुंदले, जिल्हा संस्कार सचिव ए.टी.सुरडकर, माजी नगरसेवक जगदिश घेटे,माजी नगरसेवक योगेश गजरे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतूरे, सामाजिक समता मंच अध्यक्ष राजू सवर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे,महेश लोखंडे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपकाळे,पत्रकार संतोष कोसोदे,शहर अध्यक्ष राहूल गाढे सचिव विशाल तायडे,धनराज घेटे यांच्यासह तालुक्यांतील असंख्य उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणतंय झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघरत्न दामोदर यांनी केले तर आभार राजेंद्र अटकाळे यांनी मानले .