प्रभाग क्र.12 मध्ये उत्थान निधीतून 20 लाखाचा काँक्रिट रस्त्याचा शुभारंभ अकबर अली सर यांच्या हस्ते.

धुळे (प्रतिनिधि) दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुस्लीम नगर मध्ये प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक मुख्तारमनसूरी यांच्या शहर उत्थान निधीतून 20 लाखाच्या कामाचा शुभारंभ अकबर अली सर यांच्या हस्ते, छोटे हाफिज यांच्या घरापासून ते फजल वेल्डर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.उद्घाटन, नगर सेवक मुख्तार मन्सुरी, कामगार सोसायटीचे अध्यक्ष अकबर अली सर, रफिक भाई पंप वाले, शोएब मिर्झा, शकील हाजी, कालुदादा, जमीर शेख, मंजर अली खतीब, फिरोज खाटीक, शालम भाई, शरीफ मामू व परिसरातील नागरिक उपस्थित होते.