मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात येण्याचे फारुख शेख यांचे आवाहन..

जळगाव ( प्रतिनिधी )
महिला खेळाडूंनी हॉकी या खेळात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. भारताला मेजर ध्यानचंद यांच्या नावाप्रमाणे यश मिळवून द्यावे असे आवाहन हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी प न लुंकड कन्या शाळेतील विद्यार्थिनींना
केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कन्या शाळेत मेजर ध्यानचंद व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्यात हॉकी जळगावचे सचिव तथा हॉकीमध्ये स्वर्ण विजेता प्राप्त फारुक शेख यांनी विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना विशद केल्या व अशा जादूगार असलेल्या खेळाडूला आदरांजली वाहण्यासाठी त्याच्यातील गुण आत्मसात करावे यासाठी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती नेवे, तर व्यासपीठावर पर्यवेक्षिका सौ वंदना तायडे क्रीडाशिक्षक दीपक आरडे व क्रीडा शिक्षिका सौ जयश्री माळी,दिनेश वैद्य,दीपक पाटील,उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या मुख्याध्यापिका सौ नेवे यांनी फारुक शेख यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत यावर्षीच्या शालेय हॉकी स्पर्धेत १४ व १७ वर्षाच्या गटात मुलींचा सहभाग राहील असे वचन दिले.
शेख यांनी खेळाडूंना क्रीडा साहित्य व प्रशिक्षक यांची सोय सुद्धा हॉकी जळगाव तर्फे करण्याचे फारुक शेख यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो माळी तर आभार प्रदर्शन दीपक आर्दे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सुमारे हजार विद्यार्थिनींची उपस्थिती होती.