राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त हॉकी स्पर्धा संपन्न
ध्यानचंद, विझार्ड,अँग्लो व विद्या विजयी..

उत्कृष्ट खेळाडू म्हणून अश्विनी,उबेद,निखिल व साई
जळगाव ( प्रतिनिधी ) युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दि
न साजरा करण्यात आला जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण हॉकी जळगाव सेक्रेटरी परीक्षित यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
प्रतिमेला पुष्प हार
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे गुरुदत्त चव्हाण तर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन जगदीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रीय खेळाडू सागर टेकावडे यांची खास उपस्थिती होती

हॉकी स्पर्धा व निकाल
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चार गटात हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात पुरुष, महिला व लहान मुलं या चार घटकांचा समावेश होता.
पुरुषांच्या गटात अंतिम फेरीत ध्यानचंद अकॅडमी ने विझार्ड स्पोर्ट्स अकॅडमी चा २-१ ने पराभव केला.
महिला गटात अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या वरिष्ठ गटाने कनिष्ठ महाविद्यालयाचा ३-० ने पराभव केला
विद्या इंग्लिश ने ध्यानचंद बी संघाचा १-० ने पराभव केला.
अँग्लो उर्दू ने हॉकी जळगाव चा २-० ने पराभव केला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
चे ध्यानचंद अकॅडमीचे साई पाटील, बेंगलोर तू हायस्कूलचे उसेद खान विद्या इंग्लिश मीडियम चे निखिल बारी व बेंडाळे महाविद्यालयाची अश्विनी वांडोळे
विजयी व उप विजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस तर्फे तर्फे पारितोषिक देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, फारुक शेख, इकबाल मिर्झा,वर्षा सोनवणे, सत्यनारायण पवार, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, मार्गदर्शक सुजाता गुल्हाने, मीनल थोरात सह बुद्धीबळ चे प्रवीण ठाकरे बॉक्सिंगचे निलेश पाटील, फुटबॉलचे अब्दुल मोहसीन, बास्केटबॉल चे वाल्मीक पाटील,बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती छाया चिरमाडे, अँग्लो चे मुजफ्फर शेख व पोलीस हॉकी प्रमुख शादाब सैयद यांची उपस्थित होती.