पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा“ पोदार इंटरनॅशनल

एरंडोल ( कुंदन ठाकुर)पोदार इंटर नॅशनल स्कूलच्या परिसरात भारताचे प्रसिद्ध व प्रथम हॉकीचे जादूगार क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस व रक्षाबंधन सण थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद व खशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते शालेय ध्वजाचे अनावरण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. आदरणीय प्राचार्य गोकुळ महाजन सरांनी ‘फिट इंडिया प्रतिज्ञे’तून विद्यार्थ्यांना क्रीडा, व्यायाम, स्वास्थ्य ,उत्तम आरोग्य कसे जपावे याचे महत्त्व पटवून दिले. पोदार शाळेतील सुब्रोतो कपचे विजयी विद्यार्थी नील सराफ, अनन्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेत्र दीपक कवायतींचे आयोजन करण्यात आले. क्रीडाशिक्षक वैभव काकड सरांनी आपल्या भाषणातून फुटबॉल ,क्रिकेट, बास्केटबॉल ,कॅरम ,चेस ..इत्यादी अनेक खेळ प्रकारांविषयी सविस्तर माहिती दिली. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त कविता वाचन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटक ,स्लोगन इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात प्रणित वर्मा ,आराध्या केदार, गिरीश चौधरी, अमृता पाटील, पार्थ पाटील जैनम जैन, निधी पाटील ,आयुष्यमान परिहार, जस्वीका पाटील ,काव्या झवर व इयत्ता दुसरीचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. दैनंदिन परिपाठाच्या वेळी शाळेच्या प्रांगणात उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोदार स्कूलचे उपप्राचार्य दीपक भावसार शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.