क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची सभा..

सर्व एकविध क्रीडा संघटनांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी.
जळगाव (प्रतिनिधी) शालेय क्रीडा स्पर्धेचा ज्याप्रमाणे रोज खोळंबा होत आहे. क्रीडा अधिकारी कार्यालयाचे पाहिजे तसे संघटनासोबत समन्वय नाही.
खर्चाची प्रतिपूर्ती बाबत काहीही बोलत नाही, मागील खर्चा बाबत समाधान कारक उत्तर देत नाही, तसेच महानगरपालिका स्पर्धा साठी महानगरपालिकेकडून कोणीही समन्वयक नाही, कोणीही उद्घाटन वा बक्षीस समारंभाला बोलवुन येत नाही त्यामुळे या सविस्तर बाबींची नोंद ( तक्रार) आपणास माननीय जिल्हाधिकारी जळगाव, माननीय आयुक्त क्रीडा व सेवा संचालन पुणे व माननीय क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे/ निदर्शनास आणणे आवश्यक असल्याचे माझे नम्र मत आहे त्यासाठी क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा मा.आ.चंद्रकांत सोनवणे सर यांच्या अध्यक्षते खाली दिनांक 8 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी संध्याकाळी 7 वाजता अण्णाच्या राहत्या घरी (जयकिसन वाडी जळगाव) येथे आयोजित केली असून या सभे साठी आपली उपस्थिती आवश्यक आहे.
ही विनंती.