२४ प्राईम न्युज चा आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ..

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील लोकप्रिय आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त २४ प्राईम न्युज चा शुभारंभ मुख्य संपादक आबिद शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला
६ जानेवारी पत्रकार दिवसाचे औचित्य साधून व दर्पण हे वृत्तपत्र आरंभ करून मराठी वृत्तपत्रसृष्टीची पायाभरणी करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पोर्टल न्युज २४ प्राईम न्युज चे मुख्य संपादक आबिद शेख यांनी आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ केले या वेळी ज्येष्ट पत्रकार पांडुरंग पाटील.मुन्ना शेख उपस्थित होते या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी २४ प्राईम न्युज च्या टिमला आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.