खारोट मुस्लिम कब्रस्तानाच्या सुरू असलेल्या बांधकाम तोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी..

अमळनेर ( प्रतिनिधी )
शहरातील फाफोरे रस्त्यावरील खारोट मुस्लिम कब्रस्तानाच्या नगरपरिषद मार्फत सुरू असलेल्या बांधकाम तोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिस विभागात करण्यात आली
पुन्हा अमळनेर येथील कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न… अमळनेर शहरातील खारोट कब्रस्तांनचे स्वरक्षन भिंतींचे बांधकाम अमळनेर नगरपरिषद व आमदार निधीतून सुरू असून नगरपालिकेने रीतसर परवानगी दिली असून काम कायदेशीर सुरु असताना दि.७ जानेवारी रोजी सकाळी मनोज शिंगाने सह काही लोकांनी येथील भिंतीचे बांधकाम पाडून टाकले आहे या मुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांनी केला आहे या पूर्वीही बऱ्याच वेळी या समाजकंटकांने शहरात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले होते मनोज शिंगाणे सह इतर लोकांना त्वरित अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.