खासदार श्री उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस(09051/52) भुसावळ पर्यंत धावणार….

0

 

 ही आठवड्यातून तीन दिवस असेल अमळनेर स्थानकावर मुंबई जाण्याची वेळ साय ७ :२० वा. राहिल तर मुंबई सेंट्रलहुन रात्री ११:२० वा.सुटेल अमळनेरला सकाळी १०:२० वा पोहचेल*

अमळनेर ( प्रतिनिधी ) खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता धरणगाव रेल्वे सल्लागार समिती व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व DRUCC मेंबर WR व तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत माननीय खासदार उन्मेश दादा पाटील यांना मुंबई सेंट्रल दोंडाईचा(09051/52) ही गाडी पाळधी किंवा जळगाव पर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते
यासंदर्भात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना. रावसाहेब जी दानवे व मा.ना दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व वार्तालाप केला होता.
त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!