अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या तालुकाध्यक्ष पदी राधा नेतले…

अमळनेर (प्रतिनिधी) अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमळनेर येथील राधा विनायक नेतले यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे सुपूर्द केले. समाजातील विविध घटकांवर अनेक प्रकारे अन्याय अत्याचार होत आहेत. नागरिकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. त्यांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्य करीत असते. ज्यांच्यावर काही अन्याय अत्याचार होत असतील त्यांनी लेखी तक्रार व सबळ पुराव्यानिशी तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन राधा नेतले यांनी केले आहे.
तर या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष राधा नेतले व सर्व पद्धधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.