हेट स्पीच व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा – अल्पसंख्यांक समाजाची मागणी..

जळगांव (प्रतिनिधी) जळगाव शहरात व जिल्ह्यात काही संघटनाद्वारा धार्मिक प्रचार व प्रसार अंतर्गत कार्यक्रम होत असून त्यात काही संघटना या प्रचार व प्रसार करताना दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछुटपणे प्रक्षोभन भाषण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणावरून निरनिराळ्या गटामध्येव- धर्मामध्ये शत्रुत्व वाढविणे, आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करून राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करीत आहे.
त्यामुळे जळगाव शहरात व जिल्ह्यात दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे अशा या *हेट स्पीच* व तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संघटनाविरुद्ध पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे परंतु २५ डिसेंबर २२ च्या कार्यक्रमात सुद्धा हे हेट स्पीच देऊन दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे दिसून आल्यावर सुद्धा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्याने आज जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन त्यांना लिखित तक्रार अर्ज सादर केला व चर्चा केली.
सदर प्रकरणी माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना याबाबत कल्पना देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी या शिष्टमंडळास दिलेले आहेत
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान व अक्रम देशमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष मझहर खान, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर शाकीर जमील, शिवजयंती उत्सव समितीचे फहिम पटेल, शिवसेना ठाकरे गटाचे उपप्रसिद्धीप्रमुख मतीन सय्यद, ईदगाह ट्रस्टचे अनिस शहा, आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देताना नगरसेवक रियाज बागवान सोबत शिष्ट मंडळ पदाधिकारी दिसत आहेत