केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच खुशखबर.

24 प्राईम न्यूज 8 Sep 2023 सणांचा हंगाम सुरू होत असतानाच शक्यता आहे. केंद्र सरकार आपले लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत संसदेच्या विशेष सत्रानंतर मोदी सरकार याबाबतची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.
३ टक्के वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकार सध्या असलेला महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत ३ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय १ जुलैपासून लागू होणार आहे. हा वाढीव भत्ता ऑक्टोबर महिन्याचा पगार महागाई भत्त्यात वाढीसह दिला जाईल. जुलै ते सप्टेंबरची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासह मिळू शकते. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होईल.